मनपा आयुक्त आस्तिक कुमार पांडे यांचा स्वयंपाकी कोरोना पॉझिटिव्ह निघाल्याची माहिती मनपाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ.नीता पाडळकर यांनी दिली. आयुक्तांचा स्वयंपाकिच पॉझिटिव्ह निघाल्याने मनपात खळबळ उडाली. आयुक्त होम क्वारान्टीन झाल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. शहरात कोरोनाचा उद्रेक मोठ्या प्रमाणावर होत आहे. दररोज शंभराहून अधिक पॉझिटिव्ह रुग्ण सापडत असल्याने चिंता व्यक्त होत आहे. त्यातच आज मनपा आयुक्त आस्तिक कुमार पांडे यांच्या स्वयंपाक्याचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे मनपात एकच खळबळ उडाली. आरोग्य यंत्रणेच्या सल्ल्याने आयुक्तांना तातडीने होम क्वारान्टीन करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
*नेत्यांकडून चिंता ; विभागीय आयुक्तांची उद्या घेणार भेट* दरम्यान शहरात कोणाचा फैलाव मोठ्या प्रमाणात होत असल्याने सर्वपक्षीय खासदार, आमदारांनी आज चिंता व्यक्त केली. सुभेदारी विश्रामगृहावर झालेल्या बैठकीत संसर्गाची स्थिती आटोक्यात येत नसल्याबद्दल नाराजी व्यक्त करण्यात आल्याचे बोलले जाते. उद्या सकाळी ११ वाजता खासदार डॉक्टर भागवत कराड, खासदार इम्तियाज जलील, आमदार प्रदीप जैस्वाल, आमदार अतुल सावे, आमदार अंबादास दानवे, आमदार सतीश चव्हाण, आमदार संजय शिरसाट विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांची भेट घेणार आहेत.